कु. स्नेहल सोनवणे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
कु. स्नेहल सोनवणे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
सासवड : लोकनेते दादासाहेब जाधवराव यांच्या ९० व्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून, समाजाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना स्मृती चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रीयमंत्री नितिन गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, , यावेळी दादासाहेब जाधवराव सहकारी पतसंस्थेतील लिपीक कु. स्नेहल गुलाबराव सोनवणे , व कु. सोनाली विजय घाटे यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,
यावेळी माजी कृषी राज्यमंत्री लोकनेते दादासाहेब जाधवराव , माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पुरंदर हवेली चे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप व विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,
पुरंदर तालुक्याचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी कृषीराज्य व माजी सैनिक कल्याण मंत्री लोकनेते दादासाहेब जाधवराव यांच्या ९० व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते, यावेळी, कु. स्नेहल गुलाबराव सोनवणे यांना, गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला,
कु. स्नेहल सोनवणे ही कोडीत गावची रहिवासी असून, पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष, व श्रीनाथ म्हस्कोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त गुलाबराव सोनवणे यांची ती कन्या आहे,
कु. स्नेहल सोनवणे हिला गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे,