ताज्या बातम्यामहाराष्ट्र
तरुणाकडून १४ वर्षीय मुलीस लग्नाची मागणी; पालकांनी नकार देताच नेले पळवून
सेलू:अल्पवयीन मुलीच्या लग्नास विरोध केल्याने १४ वर्षीय मुलीला दुचाकीवरून पळवून नेल्याची तक्रार सोमवारी रात्री उशीरा सेलू ठाण्यात दाखल करण्यात आली याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, एका २० वर्षीय मुलाने माझ्या १४ वर्षीय मुलीसोबत लग्न करून द्या, असे म्हणाला. मात्र, कुटुंबाने लग्नास नकार दिल्याने त्याने सोमवारी मुलीस दुचाकीवर बसून पळवून घेऊन गेला. या फिर्यादीवरून पोनि. रावसाहेब गाडेवाड यांच्या आदेशाने सेलू ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी सपोनि सुनील अंधारे व कर्मचारी यांचे पथक रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.