झुरळांना घरातून करा गायब! पावसाळ्यात ‘या’ सोप्या टिप्स वापरुन रोगापासून राहा दूर
पावसाळ्याचे दिवस सुरु होताच घरात झुरळांची समस्या उद्भवते. यावेळी घरात कितीही स्वच्छता ठेवली तरीही पावसामुळे जो ओलसरपणा घरात निर्माण होते त्यामुळे झुरळ वाढू लागतात. अशा परिस्थिती अनेकांना या झुरळांच्या त्रासापासून सूटका हवी असतेशिवाय तुम्हालाही घराच्या किचन आणि स्टोअर रूममध्ये असलेल्या झुरळांमुळे त्रास होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरातील झुरळांना पळवून लावू शकता.
झुरळांच्या त्रासापापासून सूटता करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे आणि स्प्रे उपलब्ध आहेत, परंतु ती रासायनिक आणि विषारी असतात, त्यामुळे या स्प्रेचा वापर तुमच्या शरीरासाठी घातक ठरु शकतो. अशा परिस्थितीत झुरळांना हाकलवून लावण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. तर ते घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.
झुरळांना घरातून बाहेर घालवण्यासाठीच्या टिप्स –
झुरळांना घरातून बाहेर हाकलवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे साखर, एक चमचा हळद आणि दोन चमचे बोरिक पावडर एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. पेस्ट तयार झाल्यानंतर, स्वयंपाकघरातील स्लॅबवर किंवा अशा ठिकाणी लावा जिथे झुरळ येतात, हा उपाय केल्याने झुरळे तेथून निघून जाण्यास मदत होईल.
कडूलिंब –
पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे झुरळ वाढू लागतात. अशावेळी एका भांड्यात कडुलिंबाचे तेल किंवा पाणी घेऊन ते घरामध्ये फवारावे. घरामध्ये हे पाणी किंवा तेल शिंपडल्यास झुरळ घरातून पळून जाण्यास मदत होते.
लवंग –
झुरळ लवंगाच्या वासापासून दूर राहतात, अशावेळी लवंग बारीक करून घराच्या कोपऱ्यात शिंपडा. त्याच्या वासाने झुरळे आणि पावसात वाढणारे इतर कीटक घरात येण्याचे प्रमाण कमी होते.
तमालपत्र –
तमालपत्र बारीक करून पाण्यात मिसळून घरात शिंपडा, असे केल्याने घरातून झुरळे निघून जातील. घरात आणि स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवून तुम्ही झुरळांची वाढ रोखू शकता.