ताज्या बातम्या

सांगली: प्रदीप माने यांच्यावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ सावर्डे येथे कडकडीत बंद


ठाकरे गटाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी शुक्रवारी (दि. १८) तासगाव भूमि अभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे, शिपाई दत्ता जगताप व बोगस व्यक्ती बाळू लोखंडे या तिघांच्या कानशिलात लगावली होती.सदर प्रकरणी प्रदीप माने यांच्यासह अन्य दोघांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



 

दरम्यान, हा गुन्हा दाखल करताना धादांत खोटे आरोप लावण्यात आले आहेत. या विरोधात सावर्डे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सावर्डे ग्रामस्थांनी रविवारी (दि.२०) सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला आहे. यापुढे सर्वच कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

सांगली : भूमी अभिलेखच्या कर्मचा-यांना ठाकरे गटाकडून मारहाण

सांगली : तासगावात महाविद्यालयीन तरुणींचा रस्ता रोको; बस मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा

सांगली : शिंगणापूर येथे घरफोडी, तीन लाखांचा ऐवज लंपास


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button