ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

सातारा डीसीसी बँकेतील सरकाळे घोटाळ्यात सत्यता., घोटाळ्यावर, छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले खासदार यांचा प्रहार!


सातारा डीसीसी बँकेतील सरकाळे घोटाळ्यात सत्यता., घोटाळ्यावर, छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले खासदार यांचा प्रहार!



शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा. संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांची माहिती.

साताऱ्यासह पुण्यात देखील सहकार क्षेत्रातील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मणी लैड्रीरिंग गुन्हेगारी सुरू आहे. त्याला सहकार आयुक्तांच्या व आयुक्तालयाच्या कृपाशीर्वादाने बरेचश्या गोष्टी ह्या त्या टोपीखाली दडलेल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यासंबंधी इडी कडून आलेल्या नोटीशीच्या दबक्या आवाजात सहकार क्षेत्रातील चौकशी सुरू आहे, त्या सहकार क्षेत्रातील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरुद्ध छत्रपतींचे वारसदार, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रहार करत, सहकार क्षेत्र लुटारू विरोधात दंड थोपटलेले आहेत त्याला शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य व शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने, छत्रपतींची लवकरच भेट घेत, जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सातारा डीसीसी बँकेला आलेली ईडीची नोटीस व चालू असलेल्या गुप्त चौकशीच्या अंधारामध्ये सहकार, साखर आयुक्तालय हे देखील बरबटलेले आहे ती चौकशी पूर्णपणे नेटाने झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झालीच पाहिजे त्यावर छत्रपती उदयनराजे भोसले खासदार यांनी आवाज उठवलेला आहे त्याला संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. ते पुढे म्हणाले की सातारा व पुणे सोलापूर नाशिक जळगाव धुळे औरंगाबाद लातूर बीड उस्मानाबाद नांदेड नागपूर परभणी जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक जागृत शेतकरी व विरोधी पक्ष यांनी आता ह्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील सर्व सहकारी व्यवस्थेचे मालक असलेले शेतकरी सभासद त्या व्यवस्थेचे खरे लाभार्थी झाल्याशिवाय हा संघर्ष थांबवू नये अशी लेखी विनंती संघटनेच्या वतीने खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर लेखी पाठिंबा देत विनंती करणार असल्याचे शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलनाचे निमंत्रणक विठ्ठल पवार राजे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँकेसह कोल्हापूर पुणे सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पाचही अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये मनी लँडरिंग, आर्थिक घोटाळा झालेला असून तो खेळ सहकार क्षेत्रातील अलिबाबा आणि चाळीस चोरांचे वजनाने दाबलेला आहे त्यातले मास्टरमाईंड सातारा डीसीसी चे सरकाळे, तीन-चार संचालक आणि पुणे डीसीसी चे देशमुख, चव्हाण दोन-तीन आमदार तर दोन-तीन संचालक आदी सहा सात अधकारी, तर सोलापूर डीसीसी चे माने, मोहिते, सोपल, तर कोल्हापूरचे मुशायर, सांगलीचे चव्हाण, पाटील आणि सहकार क्षेत्रातील चार प्रशासकीय अधिकारी हे देखील मोठे आर्थिक घोटाळे झालेल्या व बुडलेल्या सहकारी बँकातील भ्रष्टाचार दाबण्याचे मास्टरमाईंड आहेत, आणि त्याला सहकार आयुक्त सहकार क्षेत्रातील बाबू लोकांनी टोपीखाली दाबून ठेवलेल्या त्या टोपीखालचे पिल्लु बाहेर काढल्याच्या नंतर सहकार क्षेत्रातील चिऊ चिऊ खळबळ माजल्याशिवाय राहणार नाही असा सनसनाटी हल्ला विठ्ठल पवार राजे यांनी सहकार क्षेत्रातील तुषार सिंचन घोटाळेबाजांवर केला आहे. त्यांनी पुढे सांगितले सांगितले की आपण अनेक डीसीसी व सहकारी, राष्ट्रीय बँकातील भ्रष्टाचारी प्रकरणांच्या माध्यमातून डी सी सी बँकांत झालेल्या आर्थिक घोटाळ्या बाबत गेल्या वीस-बावीस वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून सतत आवाज उठवलेला होता, त्यात पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक बीड औरंगाबाद उस्मानाबाद या जिल्हा बँकेचा समावेश आहे, पुणे डीसीसी मध्ये झालेल्या मोठ्या घोटाळ्याचा आवाज सातत्याने दाबला जात होता त्यामध्ये तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे पासून तर आत्ताचे विद्यमान आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापर्यंत सर्व सहकार आयुक्त यांनी त्यावरती अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या दहशतीने पांघरून घालून सहकार क्षेत्रातील खुर्च्या उगवण्याचे काम केलेले आहे. सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांचे आर्थिक काम, लोन होत नाही.? मात्र अलीबाबांच्या टोळीतील लोकांना कागदपत्र न देता त्यांची बँक लोन काम मोठ्या आर्थिक लोभात होतात, त्याचे उदाहरण ए बी एल हॉटेल्स लिमिटेड ला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर 100 कोटीचे कर्ज एकाच दिवसात दिले कसे.? आणि टाटा एआयजी शेतकरी इन्शुरन्स कंपनीतील घोटाळा, खाजगी संस्थांना कोट्यावधी रुपयाची कर्ज तर मर्जीतल्या लोकांची कर्जमाफीमध्ये नावी घुसळून कर्जमाफीचा गैरफायदा अलीबाबा चाळीस चोरांच्या टोळीतील अनेक बड्या धेड्यांनी उचललेला आहे हा या ठिकाणी आम्ही जनतेच्या माहितीसाठी विषय देत आहोत.,
सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकऱ्यांचा पैसा गुंतलेला, ज्यानी सहकार उभा केला त्या ठिकाणी तिथे त्यांना किंमत नाही? त्यांना उभं केलं जात नाही! त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय, आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्र हे केवळ सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगारांपासूनच सहकार क्षेत्र उभे आहे आणि सहकार क्षेत्र वाचवायचे असेल तर सहकार क्षेत्रातील अलीबाबा आणि चाळीस चोर या सहकार लुटारू टोळीचा बंदोबस्त खासदार, छत्रपती श्रीमंत उदयन महाराज राजे भोसले यांनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत सर्व पुरावे देऊ, तसेच शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जाईल प्रसंगी रस्त्यावर उचलून त्या आली बाबांविरुद्ध आवाजही उठवला जाईल अशी सिंहगर्जना यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी केली.
सातारा डीसीसी बँकेला आलेल्या ईडीच्या नोटीसी नंतर उठलेल्या खळबळीवर खासदार, छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी आवाज उठवलेला आहे तोच धागा पकडून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने सर्वसामान्य रयतेचे राजेंचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलनाचे प्रदेश निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके, पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे , राजगुरुनगर तालुकाध्यक्ष विठ्ठल लोखंडे पाटील, कामगार आघाडीचे अध्यक्ष हिरामण बांदल व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button