कल्याण आखाडे यांच्या निवडीबद्दल बीड येथे आनंदोत्सव साजरा!
कल्याण आखाडे यांच्या निवडीबद्दल बीड येथे आनंदोत्सव साजरा!
बीड : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पक्ष कार्यालय मुंबई येथे निवडीचे पञ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल बीड ओबीसी समाज बांधवांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
सावता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माळी समाजाचे संघटन बांधण्याचे काम कल्याण काका आखाडे यांनी उभे केलेले आहे.मोठी वोटबॕंक असलेल्या या नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे ओबीसीचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.बीड येथील सावता परिषद पदाधिकारी व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने खा.शरदचंद्र पवार , प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विरोधीपक्षनेते अजितदादा पवार,आ. छगनराव भुजबळ, आ.धनजंयराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब,आ.सतिष चव्हाण,आ.संदीप भैय्या क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदींचे आभार मानले. फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या घोषणाबाजीने शहर दणाणले. यावेळी सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, माळी समाजाचे जेष्ठ नेते नामदेवराव दूधाळ, संतराम पानखडे, मोहनराव गोरे, सचिन दूधाळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास आखाडे,सावता परिषदेचे जिल्हा महासचिव प्रा.रणजीत आखाडे, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख रामराजे राऊत, शहराध्यक्ष ईश्वर राऊत, तालुका उपाध्यक्ष बाबुराव राऊत, नाळवंडीचे सरपंच राधाकृष्ण मेहेञे, असंघटित कामगार नेते संतोष निकाळजे परिट समाजाचे नेते,अॕड सुधीर जाधव,धनगर समाजाचे नेते अंकुश निर्मळ,अमर ढोणे,रमेश मदने, भगवान महासंघाचे संतोष बडे, उपसरपंच रामनाथ आखाडे, ग्रामपंचायत सदस्य भूषण कोरडे, जालिंदर आखाडे, परमेश्वर मेहेञे,सावता मुळे,बंडु जागडे, बळीराम आखाडे, बाबासाहेब शिंदे, दिनकर कोरडे, विष्णु यादव,गणेश यादव,पिनु सांळुके, बाबासाहेब काकडे, ज्ञानेश्वर देवळकर,सोहम मुळे, नारायण राऊत, सावता परिषदेचे तालुका संघटक अशोक कातखडे,तालुका उपाध्यक्ष किशोर बनकर, बाळासाहेब काकडे आदिंसह मोठ्या संख्येने सावता परिषदेचे पदाधिकारी व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.