Video:विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान..
विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
पुणे जिल्ह्यातील ता.पुरंदर मधील माहूर गावामध्ये पुणे जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्य संदीप नवले यांनी वन विभागाच्या मदतीने विहीरत पडलेल्या कोल्ह्याचे वाचविले प्राण….
पुणे : माहूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शिरसाटवाडी रोडवरील विहिरीत अंदाजे वय 2 वर्ष वय असलेला कोल्हा पडलेला राजेंद्र जगताप यांना आढळून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पुणे जिल्हा प्राणि क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य संदीप नवले यांच्याशी संपर्क केला.
व्हिडिओ पहा !
Video:विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान..https://t.co/2Hvg42ngyu
— NAVGAN NEWS BEED (@beed_news) May 13, 2023
त्यानंतर संदीप नवले वनरक्षक गणेश तांबे, परमेश्वर वाघमारे यांच्यासह तातडीने घटनास्थळी गेले. त्यानंतर वन कर्मचारी अक्षय जाधव, ओमकार जाधव, सुधीर खोमणे ,इंग्रजीत खोमणे यांनी परमेश्वर वाघमारे, गणेश तांबे , संदीप नवले यांच्या मदतीने पिंजऱ्याच्या साह्याने कोल्ह्याला विहिरी बाहेर काढले. कोल्हा सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.