आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या 50 दिवसाच्या काउंटडाऊनच्या निमित्त योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, आदर्श योग शिक्षक, आदर्श योग साधक स्पर्धा
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या 50 दिवसाच्या काउंटडाऊनच्या निमित्त योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, आदर्श योग शिक्षक, आदर्श योग साधक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय योग संस्थान, शाखा-संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोटॅनिकल गार्डन’ सिडको येथे अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या काउंटडाऊन 50 दिवसाच्या निमित्त योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, आदर्श शिक्षक / आदर्श योग साधक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
छत्रपती संभाजीनगर, दि. 02.05.2023 – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय योग संस्थान, शाखा-संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या काउंटडाऊन 50 दिवसाच्या निमित्त ‘बोटॅनिकल गार्डन’ सिडको येथे आज दिनांक 02 मे 2023 रोजी योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, आदर्श शिक्षक / आदर्श योग साधक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पासाहेब शिंदे व इतर मान्यवरांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी राज्य माहिती आयोग, संभाजीनगर खंडपीठाचे उपसचिव राजाराम सरोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आयुष अधिकारी, डॉ. शेख शकील अहमद, माजी नगरसेवक, रेखा जैस्वाल, मकरंद कुलकर्णी, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख, भारतीय योग संस्थान, महाराष्ट्र प्रांतचे उपप्रांत प्रधान, डॉ उत्तम काळवणे, विभागीय प्रधान, संजय औरंगाबादकर, पोहणेकर सर, जिल्हा प्रधान सुरेश शेळके, कैलास जाधव, वैजीनाथ डोमाने, भाऊ सुरडकर, वर्षा देशपांडे आदी उपस्थित होते.
अप्पासाहेब शिंदे व डॉ उत्तम काळवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी, सूत्रसंचालन भारतीय योग संस्थानच्या विद्या कोकणे यांनी व आभार प्रदर्शन कैलास जाधव यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात शासनाच्या पंजिकृत शाहिर मोकासरे आणि संच यांनी योग पथनाट्य, गीत आदी सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग प्रात्यक्षिक व प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आदर्श योग शिक्षक, माधुरी चव्हाण, शंकर जाधव, सुनीता डोमाळे, किशोर टाकसांडे, मधुकर पवार, भास्कर चाटे तसेच आदर्श योग साधक, सुदाम पळसकर, सुजाता न्यायाधीश, अर्चना ढोकरट, पद्माकर देशमुख, श्रद्धा पाठक, वर्षा देशपांडे यांना केंद्रीय संचार ब्यूरो, छ. संभाजीनगर तर्फे पुरस्कृत करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रश्न विचारून यातील विजेते देवेंद्र नाथ, वासुदेव जाखले, वैशाली ज्ञाते, मधुकर चव्हाण, सतीश नारखेडे यांना देखील केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती. संभाजीनगर तर्फे पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार सहायक, प्रिती पवार, शरद सादिगले, आणि प्रभात कुमार तसेच भारतीय योग संस्थान, शाखा-संभाजीनगरच्या योग साधकांन्नी विशेष परिश्रम घेतले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.