पुणे क्राईम :सासवड पोलिसांनी नाकाबंदी करून पकडला ‘डमी आमदार
सासवड : पुणे जिल्हा डमी आमदारांचे पेव फुटले आहे. विशेषतः चाकण, सासवड, भोसरी, हवेली तलुक्यात त्याचे प्रमाण मोठे आहे.
काही जण महागड्या गाड्यांना विधानसभा सदस्य (Assembly Membar) असे स्टीकर लावून बिनधास्त फिरतात. सासवड पोलिसांनाही (Police) अशीच एक गाडी काही दिवसांपासून हुलकावणी देत होती. आज अखेर नाकाबंदी करून पोलिसांनी त्या डमी आमदाराला आणि विधानसभा सदस्य असे स्टीकर लावलेली गाडी पकडली. (Saswad police caught ‘dummy MLA’)
महाराष्ट्र विधानसभा सदस्य…आमदार असे लिहिलेले आणि मध्यभागी अशोकस्तंभ असे हिरव्या रंगाचे अगदी आमदारांच्या वाहनांवर जसे स्टिकर असते. अगदी तसे स्टीकर लावलेली एक चारचाकी सासवड पोलिसांना काही दिवसांपासून दिसून येत होती. त्या त्या वेळी पाठलाग करुनही वाहन सापडत नव्हते. त्यामुळे सासवड पोलिसही टेन्शनमध्ये होते.
त्या संदर्भाने सासवड शहरात आज (ता १५ एप्रिल) जेजुरी मार्गावरील जेजुरी नाक्यावर नाकाबंदी व तपासणी पोलिसांनी सुरु केली होती. त्यावेळी विधानसभा सदस्य असे स्टीकर लावलेले वाहन पोलिसांना सापडले. त्यात कोणत्याही पक्षाचा आमदार नव्हता. पोलिसांना पकडलेला वाहनमालकाचे नाव ऋतुराज गायकवाड (रा. काळेवाडी-दिवे, ता. पुरंदर) असे आढळूनआले, त्यामुळे विधानसभा सदस्याचे स्टिकर लावून हा गायकवाड बिनधास्तपणे फिरत असल्याचे उघड झाले आहे.
कोणत्याही आमदाराच्या मालकीचे हे वाहन नसल्याने वाहतूक नियमानुसार स्टीकर जप्त करण्यात आले आहे. त्या क्रेटा वाहनाला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही. त्यामुळे मोटार वाहन कायद्याप्रमाणे सहा हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे, अशी माहिती सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. अशा पद्धतीने विधानसभा सदस्याचे स्टिकर लावून कोणी दुरुपयोग करीत असतील, फॅन्सी नंबर प्लेट असतील, वाहन कायद्यातील कलमांचे उल्लंघन केले तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !