लोकशाही विश्लेषणसंपादकीय

एकदाची निजवा,,, तिला,,,,,


एकदाची निजवा,,, तिला,,,,,

(नामदेव ढसाळ यांची माफी मागून)

लोकहो, एकदाची तिला अंजारुन ~गोंजारुन जवळ करा
ती अंगात भिनेपर्यंत जरा खऱ्या ची कास धरा,, मग पाहिजे तशी तिला वापरा, तशी ती कुणाच्या मालकीची नाही, तिला तुमच्या स्वतःच्या बापाची धाकटी सून समजा, नाही तर सरळ सरळ गाव भवानी समजा, ती जवळ असली की तिला कशी उपभोगायची याची जबरदस्त गर्मी तुमच्यात येईल,,,

मग सुरुवात तुमच्या गल्ली बोळातील घराच्या दोन-तीन पायऱ्या रस्त्यावर येतील अश्या बांधा, असलीच दोन चाकी तर रस्त्यावरच लावा, असलीच चार चाकी तर तिला असा दिवा लावा की येणाऱ्या जाणाऱ्या ची निजलीच पाहिजे,

 

घरातील नाही ~नाही तो कचरा काळया पिशवीत भरून असा फेका की जाणाऱ्या, येणाऱ्या च्या डोक्यात घुसले की
तिला तुम्ही रखेल म्हणून ठेवलं आहे,,

बाहेर पडलात की, आपला बाप, साऱ्या गावाचा बाप आहे असं वागा, ज्याची त्याची, आय भैन सगळ्या अवयवा सकट काढा, कळू द्या सगळ्या भेकडाना ती तुमच्या घरात निजली आहे,,,

 

तुमचं सगळं मंगल अमंगल कार्य असं डिजे लाऊन वाजवा की साऱ्या नामर्द जातीला कळू द्या की तुमच्याच घरात तिला कळा येऊ लागल्या आहेत,,

गाव, तालुका नाही तर जिल्हाभर असे पोस्टर, बॅनर लावा की प्रत्येकाला कळेले पाहिजे की ती तुमच्याच घरात व्याली आहे

 

बोटात, हातात,मनगटात झालच तर अंगा खांद्यावर खऱ्या खोट्या सोन्याचे असे गोफ चढवा की बुळग्या लोकांना भास होऊ द्या की ती,बालगंधर्व तुमच्या ओबड धोबड , ठेगण्या देहात शिरली आहे,

कसा जरी सुटला वारा, तरी तुमचाच हाकारा,
कोण? काय? म्हणेल ते फाट्यावर मारा

 

“ती “लोकांनी, लोकांच्या, लोकांसाठी, निपजलेली लोकशाही आहे,
निजवा एकदाची तुम्ही “तिला”
म्हणजे लोकं हळूहळू कायमचे निजतल,,,, सारं काही जळालेल्या मढयागत,,,

 

संकलन : अशोक तावरे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button