ताज्या बातम्यादेश-विदेशनागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र
नागपूर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमीला भेट..

नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्तुपातील स्मारकास तसेच भगवान बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूरच्या हिंगणा येथील इन्सापयर संस्थेद्वारे दिव्यांगांकरीता असलेले सर्वसमावेशक पुनवर्सन केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज झाले .