तरूणींची लग्नाची इच्छाच मेलीय? 30 वर्षाच्या 25.4 % आणि 20 वय असलेल्या 14 % तरूणींना लग्न का करायचं नाही?
समाजाने विवाह संस्था निर्माण केली. वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की मुला मुलींच्या लग्नाची तयारी केली जाते.
काहीवेळा प्रेम तर काहीवेळा घरच्यांच्या पसंतीने लग्न ठरते. नवं कपलही परंपरा सांभाळत मोठ्यांच्या आशिर्वादाने एकत्र आयुष्य जगतात.
केवळ समाजाचा भाग म्हणून नव्हे तर शरिराची गरज आहे म्हणूनही लोक लग्नसंस्थेवर विश्वास ठेवतात. नैसर्गानेही जगण्यासाठी जोडीदाराची गरज असते हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे. बरं हे फक्त आपल्या देशात पाळलं जातं असं नाही. तर, परदेशातील पुढारलेले देशही लग्नावर विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत एका देशात मात्र वेगळंच चित्र पहायला मिळत आहे.
पृथ्वीवर एक देश असा आहे जिथे तरूणींना लग्नच करायचं नाहीय.जपानमधील तरूणींची लग्नाची इच्छाच मेलीय? जपान सरकारच्या अहवालानुसार, 30 वर्षाच्या 25.4 % आणि 20 वय असलेल्या 14 % तरूणींना लग्नच करायचं नाहीय.
सरकारच्या या अहवालात या मुलींना लग्न का करायचं नाहीय. याचाही अभ्यास केला गेला. तर, त्यामध्ये धक्कादायक कारणं सापडली आहेत.
लग्न झालं की महिलेला एक घर सोडून दुसरीकडे यावं लागतं. दुसरं घर, माणसं सांभाळावी लागतात. त्यांच्यावर नैतिक जबाबदारी येते.हा बदल अवघड वाटणारा असला तरीही अशक्य नक्कीच नसतो. पण, तरीही काही स्त्रीयांना हा बदल नकोसा वाटतो. त्यामुळे त्या महिला या सगळ्यापासून दूर राहतात. सिंगल राहण्याचा निर्णय घेतात.
लग्नानंतर घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणे खूप कठीण होऊन बसते. तसेच, घरातली कामं, जबाबदाऱ्या यामुळे स्वत:चे आयुष्य जगता येत नाही. त्यामुळेच जपानमधील मुलींना लग्न नकोसे झाले आहे.
केवळ जपानमधील नाही तर अर्ध्या कॅनेडियन लोकांना वाटते की लग्नाची काही आवश्यकता नाही. यासोबतच चिनी महिलांनाही लग्न फारसे आवडत नाही. म्हणून त्या करत नाहीत. किंवा उशिरा लग्न करतात.