क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालत जाणाऱ्या जोडप्यावर गोळीबार


नांदेड : शहरातील विष्णुपुरी भागातील पांगरा परिसरातून तरुण तरुणी रस्त्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या एका दरोडेखोराने गाडी अडवून तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून चैन, रोख रक्कमेसह त्याला लुटण्यात आले आहे.त्याच्यासोबत असलेल्या तरुणीकडे असभ्य भाषा वापरून लज्जा उत्पन्न होईल असा प्रयत्नही त्याच्याकडून करण्यात आला आहे. त्यानंतर दरोडेखोर आणि तरुणीबरोबर असलेल्या युवकाबरोबर वाद घालण्यात आला. यावेळी दरडखोऱ्याने दोघांनाही धमकावण्याचाही प्रयत्न केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शुभम दत्तात्रय पवार हा रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून नांदेडमध्ये तरुण-तरुणी पांगरा परिसरातील फायबर बटकडे जात होते.

त्यावेळी दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेल्या एका दरोडेखोरांनी दुचाकी अडवण्यात आली. यावेळी दुचाकीवरीली दोघानाही त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून शुभम पवार यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चैन हिसकावून घेतली.

यावेळी शुभम पवार बरोबर असलेल्या तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी शुभम पवार याने तरुणीची छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने दरोडेखोराला अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

यावेळी शुभम पवार आणि दरोडेखोरामध्ये झटापटही झाली. या झटापटीतच दरोडेखोराने शुभम पवारवर पिस्तुलीतून गोळी झाडण्यात आली. ही गोळी शुभम दत्तात्रय पवार यांच्या छातीवर लागली असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

शुभम पवार यांच्यावर गोळीबार करताच ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडताच बरोबर असलेल्या तरुणीने आरडाओरड केला. त्यानंतर नागरिक जमा झाले व त्यानंतर शुभम पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

युवक युवतीला धमकावून गोळीबार झाल्याचे पोलिसांना समजताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणातील गोळीबार करणारा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली असून पोलिसांना तात्काळ आरोपी पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विष्णुपुरी परिसरातील पॉलिटेक्निकल कॉलेजवरील सुलतान जागेवरून तरुण-तरुणी जात असतात.

यावेळी विद्यार्थीनींची छेडछाड करण्याचा प्रयत्नही करण्यात येत असतो. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाचा कसून शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विष्णुपुरी भागात अनेक कॉलेज व विद्यापीठ परिसर आहे. या भागातून अनेक तरुण-तरुणी प्रवास करत असतात. या घटनेमुळे तरुण तरुणीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button