ताज्या बातम्यादिल्लीदेश-विदेशमहत्वाचे

जागतिक नेत्यांत पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय..


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून नावारूपास आले आहेत. अमेरिकेतील ख्यातनाम सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’ ने जाहीर केलेल्या जागतिक सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’ या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 टक्क्यांसह सर्वोच्च लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. या सर्वेक्षणात जगभरातील 22 मान्यताप्राप्त नेत्यांच्या रेटिंगचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मूल्यांकन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेसमोर खूपच फिके पडले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष सहाव्या क्रमांकावर

‘मॉर्निंग कन्सल्ट’ने 30 मार्च 2023 पर्यंत जागतिक नेत्यांच्या मान्यताप्राप्त मूल्यांकनानुसार, पंतप्रधान मोदी यांच्यानंतर या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचे नाव आहे, ज्यांनी 61 टक्के रेटिंगसह दुसरे स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे 55 टक्के मान्यता रेटिंगसह तिसरे आले, तर स्वित्झर्लंडचे राज्य प्रमुख अ‍ॅलेन बेर्सेट यांना 53 टक्के मान्यता रेटिंग मिळाली. यानंतर इतर सर्व राज्य प्रमुखांचे रेटिंग 50 टक्क्यांपेक्षा कमी राहिले. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे अवघ्या 41 टक्क्यांच्या मंजुरी रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो 39 टक्क्यांच्या मंजुरी रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहेत, तर यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 34 टक्के मान्यतेसह 10 व्या क्रमांकावर आहेत.

जागतिक नेत्यांची क्रमावारी

नरेंद्र मोदी-भारत 75

आंद्रेस मॅन्युएल -मेक्सिको 61

अँथनी अल्बानीज-ऑस्ट्रेलिया 55

अ‍ॅलेन बेर्सेट -स्वित्झर्लंड 53

जो बायडेन -अमेरिका 41

जस्टिन ट्रूडो-कॅनडा 39

ऋषी सुनक-यूके 34

असे झाले सर्वेक्षण

दररोज 20,000 लोकांच्या ऑनलाइन मुलाखती

रविवार 2 एप्रिलला रेटिंग प्रसिध्द केले

प्रत्येक देशात वेगवेगळ्या नमुन्यांचे 7 दिवस सर्वेक्षण

अमेरिकेतच 45 हजारांपेक्षा अधिक सर्वेक्षण

अन्य देशांमध्ये तो 500 ते 5000 दरम्यान सर्वेक्षण

भारतातील फक्त साक्षर लोकसंख्येचा समावेश


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button