सप्तश्रृंगी गडाकडे जाणाऱ्या दिंडीवर दगडफेक; तीन भाविक जखमी
नाशिक : (आशोक कुंभार )सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीवर धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत १२ ते १५ मोटारींसह दुचाकी व काही दुकानांची तोडफोड झाली तसेच तीन भाविक जखमी झाले.
या घटनेबाबत तेथे उपस्थित लोकांनी दगडफेक करणार्यांवर कारवाईसाठी पोलीस पोलिसांना माहिती दिली आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. गावात समोरासमोर आलेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनासह पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांच्या मोटारीचीही तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच पोलिसांनी ज्या भागात दगडफेक झाली तेथील संशयितांची धरपकड सुरू केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.