पुण्याचा वैचारिक वारसा जपणारा धाडशी नेता, पुण्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व लोकप्रिय खासदार गिरीश बापट साहेब यांना शेतकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…
पुण्याचा वैचारिक वारसा जपणारा धाडशी नेता, पुण्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व लोकप्रिय खासदार गिरीश बापट साहेब यांना शेतकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…
पुणे…
महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत वेगळे व्यक्तिमत्व पुण्यनगरीचे लोकप्रिय आमदार मंत्री, व विद्यमान खासदार गिरीश बापट साहेब यांचे दुःखद निधनाने मनाला फार मोठा धक्का बसलेला आहे.
आज सकाळी सहज एक शेतीविषयक आणि शहरांविषयी अभ्यास करताना सर्वप्रथम मला नाव आठवलं पुण्याचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पक्षाचे धाडसीचे अत्यंत धाडसी नेते खासदार गिरीश बापट साहेब आणि तत्कालीन माजी खासदार सुरेश कलमाडी साहेब यांची आठवण झाली होती, शेती विषयक काही बाबींचा विचार करत बापट साहेब असा उल्लेख करत असताना आता दुपारी बरोबर एक वाजता मला अत्यंत दुर्दैवी बातमी समजली आणि मोठा धक्का बसला बापू साहेबांचे दुःखद निधन झाल्याचा.
माझे आणि गिरीश बापट साहेबांचे टेल्को कंपनीत आम्ही नोकरीला असताना पासूनचे चांगले संबंध होते, गेल्या वर्षी 14 मे 2022 रोजी माझ्या शेतकरी संघटनेतील चळवळीतील एक लोकप्रिय कार्यकर्ता संपादक, दैनिक सकाळचे तत्कालीन पत्रकार व लेखक विजय नहार यांच्या अशी ही वाटचाल या पुस्तकाच्या लेखनानंतर अशी ही वाटचाल या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा आग्रह मी बापट साहेबांकडे धरला बापू साहेबांची तब्येतही ठीक नव्हती आणि त्यात कोविड19, काळ असे असताना देखील होकार दिला आणि कसबा पेठेतील त्यांच्या कार्यालयात त्यांनी त्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रसार माध्यमातून प्रकाशित करून पुस्तकाचे प्रकाशन केले.
साधारण 1978 पासून मी राष्ट्रसेवा दल सैनिक म्हणून आणि शेतकरी चळवळ मध्ये काम करत असताना बापट साहेबांनी सातत्याने मला प्रोत्साहन दिलेला आहे, ते अण्णांनी नागरी पुरवठा मंत्री असताना मी केलेल्या ऊस किमतीवर लावलेल्या इन्कम टॅक्स व शेतकऱ्यांना मिळणारी रास्त वकीपाची मूल्य अर्थात एफआरपी चे तक्रारीवर त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र लिहून शेतकऱ्यांच्या ऊस किमतीवरील इन्कम टॅक्स व एफ आर पी चा विषय आणि साखर सम्राट यांनी बेकायदेशीर केकेल्या साखर विक्रीचा विषय केंद्र सरकारच्या पटलावर अत्यंत धाडसी पनाने मांडलेला होता आहे. त्यासाठी मी त्यांचा मनापासून चा आभारी राहिलो होतो, मला त्यांनी शेतकरी प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये अनेक शब्द दिलेले होते पण मी कधीही कोणत्याही शब्दाचा हट्ट त्यांच्याकडे धरून बसलेला नाही परंतु अत्यंत प्रामाणिक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व पुण्याचा धाडशी नेता, खासदार कसा असावा आणि त्यांचे गुण कसे असावेत किंवा त्यांची नागरिकांप्रती वागणूक कशी असावी तर त्या सर्वांचे एकमेव उदाहरण राहिलेला आहे ते सन्माननीय लोकप्रिय खासदार गिरीश बापट साहेब.
त्यांच्या मागील आजारपणाच्या काळामध्ये वाढदिवसानिमित्त साम टीव्हीचे पत्रकार सचिन जाधव यांनी त्यांची घेतलेली परखड मुलाखत म्हणजे बापट साहेब भारतीय जनता पक्षाचे आमदार मंत्री किंवा खासदार नव्हते तर ते पुण्याचे खासदार होते हे सडेतोडपणे उत्तर देणारा एकमेव धाडसी आणि निर्भीड नेता म्हणून खासदार गिरीश बापट साहेबांचा नावलौकिक आहे. साम टीव्ही चे पत्रकार सचिन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीवर, खासदार गिरीश बापट साहेबांनी तितक्याच सडेतोडपणे दिलेली धाडशी मुलाखत., उत्तर लाजवाब आणि पुण्याचा खासदार नव्हे तर पक्षाचा सुद्धा नेता, कसा असावा, लोकांप्रति त्यांना कसा आदर असावा त्याचं एक जबरदस्त आणि धाडसी उदाहरण द्यायचं झालं तर निश्चितपणे गिरीश बापट साहेब आहेत, स्वर्गीय खासदार गिरीश बापट साहेब यांच्या नावाची नोंद पुणे चा इतिहास नक्कीच घेईल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
लोकप्रिय नेते माजी आमदार मंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट साहेब यांच्या दुःखद निधनाने वैयक्तिक माझे वर आणि पुण्यावर फार मोठी शोक काळा पसरलेली आहे ! लोकप्रिय तत्कालीन आमदार, स्व. विद्यमान खासदार गिरीश बापट साहेब यांना श्रद्धांजली वाहताना खरोखर शब्द अपुरे पडतील. मी, विठ्ठल पवार राजे परिवार, तसेच अखील भारतीय धार संस्थान राजे पवार परिवार व शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारत च्या वतीने व माझ्या वैयक्तिक धार पवार कुटुंबाच्या वतीने स्वर्गीय लोकप्रिय धाडसी खासदार गिरीश बापट साहेब यांना अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
विठ्ठल पवार राजे.
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.