गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात – इंदुरीकर महाराज
बीड : गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर आली आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत गौतमी पाटीलचा समाचार घेतला आहे.
तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आरोप… अशा शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता समाचार घेतला. गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर टीकेची तोफ डागली.
नृत्यांगना गौतमी पाटील सध्या राज्यभरात चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचीही भर पडलीये. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील हिचा समाचार घेतला आहे.