दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230228-WA0017-1.jpg)
पालघर : ( आशोक कुंभार ) दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची क्रूर घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली आहे. खुनी रमेश दुबळा (४५) हा मुलीच्या शेजारीच राहत होता. या घटनेनंतर संपूर्ण तलासरी तालुका हळहळ व्यक्त करीत आहे. ४५ वर्षाच्या दुबळा या इसमाचे या मुलीच्या घरच्यांसोबत वाद होते. या वादाच्या रागातून या इसमाने या अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून आपल्या मोटरसायकलवर बुधवारी नेले. रात्र झाल्यानंतर आपली मुलगी घरी आली नसल्याने मुलीच्या आई-वडिलांनी तलासरी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मिसिंगची तक्रार दिली.
पोलिसांनी लागलीच आपली तपास चक्र फिरवून एका परिसराचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले व या सीसीटीव्ही फुटेजमधून मुलीला मोटरसायकलवरून नेत असलेला इसम हा घराच्या शेजारीच राहत असल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे व त्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून अत्याचार करणाऱ्याला पकडण्यासाठी तातडीने शोध मोहीम राबवली. शोध मोहीम राबवून एक ते दीडच्या सुमारास दुबळा ह्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, त्याने अत्याचार करून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली असे पोलिसांनी म्हटले आहे.
घरापासून पाच ते सहा किलोमीटर भागात असलेल्या शाळा परिसरात या मुलीला दुबळा याने नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला व तिचा खून केला. मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तिचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.