क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदाराचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन


नगर – कोपरगाव तहसीलदाराने शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर व उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांबरोबर गैरवर्तन केले. मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा विरोध दर्शवत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आज निदर्शने गैरवर्तनप्रकरणी तहसीलदारांना अटक न केल्यास सोमवारपासून जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा, परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा आंधळे यांनी दिला. कोपरगाव तालुक्‍याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन केले. कोपरगाव येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ते आले होते. त्यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. त्याचबरोबर कामावर हजर असलेल्या शिपायाला रुग्णालयाबाहेर काढले. मद्यसेवन करून त्यांनी हे गैरवर्तन केले.याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व परिचारिका निदर्शने करीत तहसीलदारांच्या अटकेची मागणी केली. या आंदोलनात महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना, वैद्यकीय अधिकारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष सुरेखा आंधळे, छाया जाधव यांच्यासह जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, इंदिरा डुलगस, डॉक्‍टर संघटनेचे डॉ. प्रसाद सायगावकर, नारायण पवार, डॉ. काळदाते, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. अशोक कराळे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. नरेश पेवाल डॉ. विक्रम पानसंबळ, निलेश तांबे यांच्यासह अधिकारी कर्मचारी व परिचारिका मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी पाठिंबा दिला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button