मेहुणीवर बलात्कार करणाऱ्या टेलरला दहा वर्षांचा कारावास
स्वत:च्या मेहूणीवर बलात्कार करणाऱ्या एका 38 वर्षीय टेलरला सत्र न्यायालयाने दोषी मानून दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 2017 रोजी 24 वर्षीय मेहूणीवर अंधाराचा फायदा घेत तिला मारहाण करून बेशुद्ध करीत आरोपीने बलात्कार केला होता. त्यामुळे डीएनएच्या तांत्रिक पुराव्याला ग्राह्य मानीत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित सजा सुनावली. पीडीता आरोपीच्या पत्नीची लहान बहीण आहे. घटने दिवशी मेहुणीचा पती घराबाहेर गेल्याची संधी साधत आरोपीने बलात्कार केला.
पीडीता आरोपीच्या पत्नीची लहान बहीण आहे. घटने दिवशी मेहुणीचा पती घराबाहेर गेल्याची संधी साधत आरोपीने बलात्कार केला. यावेळी त्याने मेहुणीचा तोंड दाबल्याने ती बेशुद्ध पडली. तिच्या शरीरातील घेतलेले नमूने आरोपीच्या डीएनएशी जुळल्याने हा पुरावा ग्राह्य मानत सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी आरोपीला दोषी ठरवित दहा वर्षांची सजा सुनावली.
आरोपी पीडीतेचा नातलग असूनही त्याने हा अत्यंत हीन दर्जाचा गुन्हा केल्याने त्याला जन्मठेपेसह कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकील मीरा चौधरी – भोसले यांनी केली होती. पीडीतेसह एकूण दहा साक्षीदार कोर्टाने तपासले. पिडीतेने कोर्टाला सांगितले की बहीण आणि तिचा नवरा शेजारीच रहात असून झोपडीला दार नसल्याचा फायदा घेतला गेला. घटने दिवशी झोपडीत वीज नसल्याने त्याचा ही फायदा आरोपीने घेतल्याचे कोर्टाला सांगितले.
हात जोडून विनवण्या केल्या
21 एप्रिल 2017 रोजी पती कामानिमित्त बाहेर गेल्याने आपल्या मुलांसह 24 वर्षीय पीडीतेच्या घरात आरोपीने प्रवेश केला. आणि तोंड तसेच गळा दाबून पिडीतेवर अत्याचार केला गेला. तिने हात जोडून विनवण्या केल्या तरी आरोपीने ऐकले नाही. तिने प्रतिकार केला असता त्याने तोंड जोरात दाबल्याने ती बेशुद्ध पडून तिला अनेक जखमा झाल्या. ती शुध्दीवर आली तेव्हा तिची सलवार जागेवर नव्हती. ती बहिणीकडे तक्रार करण्यासाठी गेली असता मेहुणा फरार झाला होता. त्यामुळे तिने अखेर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम वगळले
आरोपीवर खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम देखील दाखल करण्यात आले होते. मात्र सरकारी पक्ष खूनाचा प्रयत्न असल्याचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आरोपीच्या गळ्यावर नखांनी झालेल्या जखमांचा वैद्यकीय पुरावा सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने आरोपीला खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे न्यायालयाने स्पष्ठ केले आहे.