ओवेसींच्या घरावर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या!
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर रविवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा काही लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला.
दगडफेकीनंतर ओवेसी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे. घरावर दगडफेक केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अशोक रोड परिसरात ही घटना घडली. माहितीनंतर अतिरिक्त डीसीपींच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलिसांच्या पथकाने ओवेसी यांच्या घराला भेट दिली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.
या घटनेबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मी रात्री 11:30 वाजता माझ्या निवासस्थानी पोहोचलो. परत आल्यावर मला दिसले की, खिडकीच्या काचा तुटलेल्या होत्या आणि आजूबाजूला दगड पडलेले होते. माझ्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली की, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली.