क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली..


शहरातील चंपावती शाळेत कार्यरत असलेले पांडुरंग भुतपल्ले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने मित्रमंडळीसह कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. रात्री झोपी गेलेल्या भुतपल्ले यांनी पहाटे उठून कुणाला काहीही न सांगता गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही अस्पष्टचं आहे. पोलिसांनी याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

बीड : बीड शहरातील धानोरा रोडवरील पिंगळेनगर भागात एका शिक्षकाने (Teacher) घराच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. पांडुरंग काळबा भुतपल्ले (वय 55 वर्षे, रा. पिंगळेनगर, धानोरा रोड, बीड) असे मयत शिक्षकाचे नाव असून, 18 फेब्रुवारीला ही घटना पहाटे घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग भुतपल्ले हे शहरातील चंपावती शाळेत कार्यरत होते. दरम्यान नेहमीप्रमाणे जेवण करून,17 फेब्रुवारी रोजी भुतपल्ले झोपी गेले. मात्र 18 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच ते सहावाजेदरम्यान पांडुरंग भुतपल्ले यांनी घराच्या खिडकीला बाहेरून दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी सहा वाजता पत्नीला पती घरात दिसेनात म्हणून शोध घेतला असता घटना उघडकीस आली.

दरम्यान शेजारच्या मदतीनं भुतपल्ले यांना फासावरून उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान याची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे हवालदार संजय राठोड, अंमलदार भागवत घोडके यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दिनेश पांडुरंग भुतपल्ले याच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास अंमलदार भागवत घोटके करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button