तुर्कीमधील भूकंपामुळे पृथ्वीवर 300किमी लांब भेगा, उपग्रहाने टिपले विनाशाचे वास्तव
तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. त्यानंतर Accept 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
भूकंपात आतापर्यंत 25,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या विध्वंसाचे छायाचित्रण सॅटेलाइट इमेजेसमध्ये करण्यात आले आहे.
यूकेच्या सेंटर फॉर द ऑब्झर्व्हेशन अँड मॉडेलिंग ऑफ अर्थक्वेक्स, ज्वालामुखी आणि टेक्टोनिक्स (COMET) ने भूमध्य समुद्राच्या ईशान्य टोकापासून पृथ्वीला पडलेल्या 300 किमी पेक्षा जास्त लांबीच्या भेगांचे चित्र दाखवले आहे. भूकंपामुळे झालेल्या मोठ्या विनाशाचे परिणाम दर्शविण्यासाठी कॉमेटने दोन्ही देशांची आधी आणि नंतरची छायाचित्रे टिपली आहेत.
या चित्रांमध्ये भूकंपामुळे पृथ्वीला दोन मोठे तडे पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी एक 125 किमी लांब आहे. तर दुसरा तडा त्याहून मोठा आहे. NDTVच्या वृत्तानुसार, COMET टीमचे नेतृत्व करणारे टिम राइट यांनी Space.org ला सांगितले की, ‘भूकंप जितका मोठा तितका जमिनीला भेगा पडण्याचा धोका अधिक’ ते म्हणाले की, ‘काही तासांमध्ये दोन मोठ्या तीव्रतेचे भूकंप होणे ही असामान्य गोष्ट आहे. सामान्यत: मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्के बसतात, परंतु तुर्कस्तान-सीरियामध्ये हे दोन्ही भूकंप मोठ्या तीव्रतेचे होते.’