भारताच्या बाबतीत ही हूगरबीट्सचे भाकित खरे सूरतमध्ये ३.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
सुरत : गुजरात सूरतमध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाचे धक्के बसले आहेत. दि. १० फेब्रुवारी रोजी हे भूंकपाचे धक्के बसले. इन्स्टिटयूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च या संस्थेने ही माहिती दिली आहे.
या भूंकपाचा केंद्रबिंदू सुरतच्या पश्चिम -नैऋत्येस सुमारे २७ किमी अंतरावर, भूपृष्ठापासून ५.२ किमी खोलीवर होता. यात शहर पुर्णपणे सुरक्षित असून शहराला कोणताही धोका नाही.तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
भारताच्या बाबतीत ही हूगरबीट्सचे भाकित खरे
डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप होणार, असे भाकीत दि. ३ फेब्रुवारीला केले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत म्हणजे दि. ६ फेब्रुवारीला आलेल्या भूकंपामुळे २१ हजारांहून अधिक मृत्यू झाले. हूगरबीट्स यांनी आता नव्याने केलेल्या भविष्यवाणीत भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबाबतही मोठा भूकंप येणार असल्याचे म्हटले होते. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड ‘व्हायरल’ होतोय. त्यामुळे या तीनही देशांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तुर्कीविषयीची भविष्यवाणी खरी ठरल्याने आता भारतात भूकंप होणार असल्याची भविष्यवाणीही खरी ठरली. त्यामुळे भारतासाठी हे खूप भीतिदायक त्याचबरोबर धक्कादायक वृत्त आहे.
भारतातील आठ राज्ये भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. ‘झोन ५’ मध्ये सर्वात तीव्र भूकंप होतात. गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर, नागालॅण्ड, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान आणि निकोबार ‘झोन-५’मध्ये येतात. मध्य हिमालयीन प्रदेश हा भूकंपदृष्ट्या जगातील सर्वात सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे. राजधानी दिल्लीतही भूकंपाचा धोका आहे. दिल्ली-एनसीआर हिमालयाजवळ असल्याने टेक्टोनिक प्लेट्समधील बदल येथे जाणवतात.