क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मोदी सरकारविरोधात टीका करणारी अमेरिकन सदस्य ओमारची हकालपट्टी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी आणि भारतात मुस्लिमांविरोधात अत्याचार सुरू असल्याचा कांगावा करत मोदींना आपण कसे काय पाठिंबा देतो असा सवाल विचारणारी इलहान ओमार हिची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तिने केलेल्या यापूर्वीच्या सहा वादग्रस्त विधानांमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकन संसदेत तिच्या हकालपट्टीचा ठराव मांडण्यात आला आणि २१८ विरुद्ध २११ मतांनी तिची हकालपट्टी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

इलहान ओमार (४०) ही नेहमीच भारताविरुद्ध बोलताना दिसली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिने पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली आणि त्यानंतर तिने तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी बायडेन सरकारने तिची ही भेट वैयक्तिक असल्याचे म्हटले होते. काश्मीरबद्दलच्या अमेरिकेच्या भूमिकेशी तिच्या या भेटीचा काहीएक संबंध नाही, असे बायडेन यांच्याकडून सांगण्यात आले होते.

याआधीही तिने बायडेन सरकारवर भारतातील मोदी सरकारच्या निमित्ताने भाष्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर बायडेन सरकार का टीका करत नाही, असा सवाल तिने उपस्थित केला होता.

शुक्रवारी रिपब्लिकन सरकारचे प्रवक्ते केविन मॅकार्थी यांनी तिच्या काही जुन्या विधानांचा संदर्भ देत तिची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले. २००१मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल ती म्हणाली होती की, काही लोकांनी काहीतरी केले आहे. २०१९मध्ये ती म्हणाली होती की, इस्रायलला अमेरिकेने दिलेला पाठिंबा हा इस्रायल समर्थकांच्या हातमिळविणीतून केलेला आहे. ओमारने नंतर आपल्या म्हणण्यावर बिनशर्त माफी मागितली होती.

ओमार यांची हकालपट्टी ही २०२१ला रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांची जी हकालपट्टी केली होती, त्याची परतफेड असल्याचे काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. त्यावेळी डेमोक्रॅट्स पक्षाचे बहुमत असताना रिपब्लिकनच्या मॅरजोरी टेलर व पॉल गोसर यांना समित्यांमधून काढण्यात आले होते. आता ओमार या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button