परीक्षा देण्यासाठी पत्नी आणि मेव्हणी आल्या, प्रियकरासह पळून गेल्या..
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्राहून परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची पत्नी आणि मेव्हणी अचानक गायब झाल्याची अजब घटना समोर आली आहे. आता तो तरुण त्यांचा शोध घेत आहे.
ही बाब पोलिसांनाही कळवण्यात आली होती, मात्र खरं समोर आल्यावर पतीलाच मोठा धक्काच बसला. पत्नी आणि मेव्हणी प्रियकरासह पळून गेली आहे. हे प्रकरण शहरातील कोतवाली भागातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्राच्या डांकी पोलीस स्टेशन क्षेत्रातील विसरना गावात राहणाऱ्या तरुणाचे सासर बांदा येथील जसपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात आहे. पत्नी व मेव्हणीची परीक्षा देण्यासाठी बांदा येथे आल्या होत्या. बांदा येथे 30 जानेवारीला परीक्षा होती. परीक्षा दिल्यानंतर पत्नी व मेव्हणी जसपुरा येथे जाऊ असे सांगून निघून गेल्याने तरुण रात्री शहरातील एका नातेवाईकाच्या घरी थांबला.
घरी जाण्यास सांगितलं आणि प्रियकरासह गेली पळून
सकाळी पत्नी व मेव्हणी गावात पोहोचले नसल्याचे समजताच त्यांनी नातेवाईकांसह त्यांचा शोध सुरू केला. 2 दिवस त्या सापडल्या नाहीत तेव्हा तरुणाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, पत्नी व मेव्हणी आपल्याला फसवून प्रियकरासह पळून गेल्याचे समजताच त्याला मोठा धक्काच बसला. दोन्ही तरुणांची माहिती समजल्यानंतर पतीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात कोतवाली प्रभारी श्याम बाबू शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने दोन तरुणांवर पत्नी आणि मेव्हणीला फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू असून, सध्या त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.