Video : शेवटी आईच ती! रस्ता ओलांडण्यासाठी पिल्लाला..
एका हत्तणीचा जंगलातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती आपल्या पिल्लाला जंगलातील रस्ता ओलांडायचे धडे देत आहे. तर एका आयएएस असलेल्या महिला वन अधिकाऱ्याने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
Mother elephant seems teaching her baby how to cross the road.A sad reality
Video- Santhanaraman pic.twitter.com/Nmn1mrhFvv
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) January 30, 2023
आई ही आईच असते शेवटी… ती आपल्या मुलाला सगळं काही शिकवत असते. मग ती प्राण्यांची आई असो की माणसांची… या हत्तीणीचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला असून ती आपल्या पिल्लाला घेऊन रस्ता ओलांडत आहे. त्यानंतर रस्त्यावरील वाहने पुढे जातात. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, जंगल हा जंगली प्राण्यांचा अधिकृत अधिवास आहे. तर त्यावर मानवाने अतिक्रमण केल्यामुळे प्राण्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर आज प्राण्यांना आज पिल्लांना रस्ता कसा ओलांडायचा हे शिकवण्याची वेळ आलीये. ‘हे वाईट आहे’ असं कॅप्शन साहू यांनी आपल्या ट्वीटवर टाकलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपली मतं व्यक्त केली आहेत.