17 वर्षांनी ठप्प होणार पृथ्वीचं केंद्र; त्याचे परिणाम जाणून घ्या..
आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरताफिरता स्वत:भोवतीही फिरते, ही गोष्ट जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आपल्या पृथ्वीचं केंद्रसुद्धा फिरतं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
पृथ्वीच्या गाभ्याच्या केंद्रस्थानी गरम आणि घन लोखंडी कवच आहे. ज्यामुळे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते. पृथ्वीचं केंद्र एकाच दिशेनं फिरत असल्यामुळे हे घडतं. पण, केंद्राची ही गती काही काळ थांबली आणि नंतर तिची दिशा बदलली तर काय होईल?
असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, शास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञांनी (सायस्मॉलॉजिस्ट) यांना असं आढळलं आहे की, पृथ्वीचा गाभा आपल्या रोटेशनची दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. त्याआधी तो काही काळ ब्रेक घेणार आहे. म्हणजेच पृथ्वीचं रोटेशन थांबेल.
एका वृत्तवाहिनीनं या प्रकारचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पृथ्वीच्या गाभ्याचं रोटेशन हे वरच्या पृष्ठभागाची स्थिरता निश्चित करतं. या रोटेशनमध्ये सुमारे 70 वर्षांनी बदल होतो.