बीड लुटमार झाल्याचे सांगून मालकाला लाखोंचा गंडा
मालकाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नोकराला बीड पोलिसांनी तब्बल सात महिन्यानंतर अटक
व्यापाऱ्यांकडून पैशाची वसूली करून परतत असलेल्या फिर्यादी नोकराला कारमधून आलेल्या लुटारूने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा संगनमताने झाल्याचे कळले. पोलिसांनी फिर्यादीसह अन्य एका आरोपीली ताब्यात घेऊन सक्तीने विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
बीड : नोकर हा मालकाकडे अनेक वर्षांपासून कामाला होता. त्यामुळे मालकाचा त्याच्यावर विश्वास होता. दरम्यान व्यापाऱ्यांकडून पैसे आणण्याचे काम फिर्यादी नोकराला देण्यात आले होते. झटपट श्रीमंत होण्यासाठी नोकराने स्वत:च्याच लुटमारीचा बेत आखला. (Servant arrested in Robbery Case) त्यानुसार (Servant connivance with robbers) आपल्याला लुटारूनी रस्त्यात अडवून पैसे हिसकावून पळ काढल्याचे नोकराने (robbery at knifepoint) सांगितले होते. ज्यावर मालकाचा विश्वासही बसला. या प्रकरणात फिर्यादी नोकराने पोलिसांकडे तक्रारही केली होती. हा सर्व प्रकार गुप्तहेराच्या माहितीच्या आधारे बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगांवहून वसूली करून परतत असलेल्या नोकराला अडवून लुटारूंनी पैसे लुटल्याचा बनाव नोकराने केला. लुटीचा आकडा ३ लाख ११ हजार असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम मालकाची असल्याने नोकरानेच पोलिसांकडे घटनेची तक्रार केली. ११ जुलै २०२२ रोजी धामणगांव शिवारात फिर्यादी आदेश गौतम बोखारे हे व्यापाऱ्यांकडून वसूल केलेले पैसे घेऊन धामणगांव येथून परतत होते. यावेळी मागून कारने आलेल्या दोन लुटारूंनी फिर्यादीस अडवून चाकूचा धाक दाखवत फिर्यादी जवळील 3 लाख ११ हजार रुपये असलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून नेली होती. त्यावरून अंभोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.