ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड बोगस मतदान प्रकरणी कारवाईसाठी “लोकशाही वाचवा देश वाचवा” आंदोलन


बोगस मतदान प्रकरणी कारवाईसाठी “लोकशाही वाचवा देश वाचवा” आंदोलन
___

बीड जिल्ह्य़ात एकाच मतदाराने दोन अथवा तीन मतदार संघात नावे नोंदवत बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.०९ जानेवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” लोकशाही वाचवा देश वाचवा “आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुबीन,शेख मुश्ताक,सय्यद आबेद,मिलिंद सरपते,बलभीम उबाळे ,किस्किंदाताई पांचाळ,अड.प्रेरणा सुर्यवंशी,सय्यद सालेहा आदि उपस्थित होते. निवेदन तहसीलदार जि.का. बीड मनिषा लटपटे.यांना देण्यात आले.

बीड जिल्ह्य़ात एकाच मतदाराने २ किंवा ३ मतदार संघात नावे नोंदवली असून निवडणूक आयोगाला मतदार याद्या अद्यायावत करताना एकाच चेह-याचे ६१ हजार २७० चेहरे आढळुन आले असून या पाहणीत ६१ हजारापेक्षा जास्त बोगस मतदार आढळुन आले आहेत. तालुका निहाय बोगस मतदार पुढील प्रमाणे असून गेवराई ८ हजार ८१८ ,आष्टी ८ हजार ८५७ , परळी ९ हजार ८५० , माजलगाव १० हजार ४६१ , केज १२ हजार ८२० , बीड तालुक्यात १२ हजार ८२० मतदार समान चेह-याचे निदर्शनास आले आहे.

कोट
__
समान चेह-यानंतर समान नावे असणा-या मतदारांची फेरतपासणी करावी. राजकीय पुढारी,संस्थेमधील आधिकारी, कर्मचारी यांची प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागात दोन मतदार संघात नावे निवडणूक आधिका-यांशी संगनमतानेच लावण्यात आली असून निकालावर परीणाम करणारे धक्कादायक आकडे असुन संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. :- डाॅ.गणेश ढवळे

फोटो:- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “लोकशाही वाचवा-देश वाचवा आंदोलन करताना डाॅ.गणेश ढवळे यांच्यासह सहकारी

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button