बहिणीच्या लग्नाआधीच भावाने आत्महत्या
जमुई, 28 नोव्हेंबर : ज्या घरात मंगलप्रसंगाच्या औचित्याने शुभ गाणी गायली जात होती आणि शहनाई वाजवली जात होती, त्याचठिकाणी एका भयानक घटनेने संपूर्ण वातावरणच बदलून गेले.बहिणीच्या लग्नाआधीच भावाने आत्महत्या केल्याने समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील अंबा गावातील आहे. याठिकाणी बहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री 34 वर्षीय उमेशकुमार महतो याचा विष घेतल्याने मृत्यू झाला. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर उमेश कुमार महतोने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला, त्यातून दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले, त्यात पतीला आपला जीव गमवावा लागला. मात्र, ग्रामस्थ या गोष्टीचा इन्कार करत आहेत. केवळ 34 वर्षीय उमेशकुमार महतो याने विष घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. उमेश कुमार महतोचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्न झाल्यापासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत उमेश बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. डेकोरेटरचे काम करणाऱ्या उमेशने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी तंबू आणि दिवे लावण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत केले, त्यानंतर पत्नीशी काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. हेही ‘मी मरेल आणि तुलाही मारेल’ धमकी देऊन तरुणाने 17 वर्षीय मुलीला रस्त्यावर अडवले रविवारीच उमेशच्या बहिणीचे लग्न होणार होते. बहिणीच्या लग्नासाठी जमुई जिल्ह्यातील अलिगंज ब्लॉकमधील दारखा गावातून उमेशच्या घरी लग्नाची वरात येणार होती, पण आता ज्या घरातून बहिणीची वरात जाणार होती. तिथेच भावाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला.