क्राईम

अल्पवयीन मुलीवर सात जणांचा अत्याचार ,व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल


भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.



या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून भिवंडी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून तिघे फरार आहेत.

पीडितेस तिच्या मित्राने २ ऑक्टोबर रोजी खारबाव भागातील घरात बोलावले होते. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या तरुणाने त्याच्या सहा मित्रांना या ठिकाणी बोलावले आणि सर्वांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यादरम्यान समाज माध्यमांवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पीडितेने रविवारी (ता. १५) तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली; तर इतर तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान अटक आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button