क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

विद्या चव्हाण, अदिती नलावडे यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं, यावेळी सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती.
हे आंदोलन करणं आता या पदाधिकऱ्यांना भोवलं आहे, कारण त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रमुख मेहबुब शेख यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी भादंवि कलम १४३सह इतर अनेक कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button