प्रवाशांच्या सामानाची तपासणी केल्याने 4,97,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 4.1 कोटी भारतीय रुपयांच्या नोटा ताब्यात
मुंबई : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कारवाईत 4.97 अमेरिकन डॉलर्स हे अमेरिकन विदेशी चलन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमेरिकन डॉलर्सची भारतीय रुपयांमध्ये सुमारे 4.1 कोटी इतके किंमत आहे.
या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई एअर इंटेलिजन्स युनिट कडून मिळालेल्या गुप्त माहिती आधारे सीमा शुल्क विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फ्लाय दुबई फ्लाइट एफझेड 446 द्वारे दुबईला जाणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांच्या कुटुंबाला रोखण्यात आले. कुटुंबात दोन वृद्ध प्रवासी आणि एक पुरुष प्रवासी होता. तिन्ही प्रवाशांच्या सामानाची तपासणी केल्याने 4,97,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 4.1 कोटी भारतीय रुपयांच्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहे.
मुंबई सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून दुबईला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका कुटुंबातील 3 व्यक्तींच्या बॅगेज स्कॅनरमध्ये एका बॅगेत काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. बॅग उघडली असता त्यात अमेरिकन डॉलर्स आढळून आले. हे डॉलर्स साड्यांच्या मधोमध बुटांच्या आत डॉलर लपवून देशाबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील तिघांना विदेशी चलनासह अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. त्याने हे अमेरिकन डॉलर कुठून आणले आणि या चलनाचे पुढे काय करायचे होते, याचा तपास सुरू आहे.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !