ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

ऑक्टोबर महित्यात 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका


मुंबईः राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महित्यात 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होतील.

यंदा थेट जनतेतून सरपंच (Sarpanch) पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकांबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्यातल्या एकूण 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. संबंधित गावांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी मतमोजणी पार पडेल. ही घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

निवडणूक कार्यक्रम काय?

13 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.
कोणत्या जिल्ह्यांत किती ठिकाणी निवडणूका?

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70.
रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2.
नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.
एकूण- 1,166.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button