दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा
दिल्लीतील एक्साईज पॉलिसीमध्ये (Delhi Excise Policy) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने (CBI) शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी छापा मारला.
जवळपास दहा तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपास करत आहे. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. दिल्लीतील मद्य धोरणाविरोधात सीबीआयनं 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सीबीआय अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती दिली आहे.
सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत 15 जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. सीबीआयच्या मते, मनीष सिसोदिया यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्लीमधील घरी आणि सात राज्यात 20 अन्य ठिकाणी छापेमारी केली. जवळपास दहा तासांपासून सीबीआयचा तपास सुरु आहे. दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती.