श्रीकृष्णाचा 5249 वा जन्म उत्सव
मथुरा, वृंदावन, द्वारका आणि देशभरातील विविध ठिकाणी असणाऱ्या इस्कॉन मंदिरांमध्ये नुकताच कृष्णजन्म साजरा करण्यात आला. या दिवशी विशेष 8 योगही अनेकांनी अनुभवले.
परिणामी यथासार कृष्णजन्माची पूजाअर्चा करणाऱ्यांवर आता या लड्डूगोपालाची कृपा असेल यात शंका नाही.
ध्रुव, छत्र, महालक्ष्मी, बुधादित्य योग, हर्ष, कुलदीपक, भारती, सत्कीर्ति राज योग असे 8 योग कृष्णदन्माच्या निमित्तानं तयार झाले होते. तब्बल 400 वर्षांनंतर ताऱ्यांची अशी स्थिती पाहायला मिळाली. त्यामुळं ज्योतिषविद्येमध्ये हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला.
पंचामृत, अत्तर, सुगंधी फुलांचा वापर करत कान्हाला स्नान घालून गुरुवारी घराघरांमध्ये त्याची विझीवत पूजा करण्यात आली. कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णानं पृथ्वीवर जन्म घेतला. विविध धर्मग्रंथांमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार हा श्रीकृष्णाचा 5249 वा जन्म उत्सव आहे.
नक्षत्रांची रचनाही अदभूत…
कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. देवाच्या कुंडलीमध्ये वृषभ राशीचा उल्लेख होता. आपण ज्या काळात राहतोय त्या काळात आपल्याला चक्क देवाच्या वयाची माहिती मिळणं, हे किती भारावणारं आहे