ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

देशभरात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे


देशभरात श्रीकृष्णाची (Krishna Janmashtami) अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये अत्यंत प्राचीन मंदिरापासून ते आधुनिक काळात बांधलेल्या भव्य मंदिरांचाही समावेश आहे.

आता तर जगाच्या पाठीवर सर्वत्र श्रीकृष्ण मंदिरे उभी राहिलेली आहेत. पाहूयात आपल्या देशातील अशीच काही काही जुनी आणि प्रसिध्द मंदिरे…

द्वारकाधीश (गुजरात)
 Krishna Janmashtami

गुजरातमधील द्वारका धामाची गणना सप्त मोक्षपुर्‍यांमध्ये होते. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी (Krishna Janmashtami) द्वारका नगरी वसवली होती. मूळ द्वारका त्यांच्या निर्याणानंतर आठ दिवसांनी समुद्राने गिळंकृत केली. सध्याच्या द्वारका नगरीत भगवान द्वारकाधीशांचे भव्य मंदिर आहे. त्याला द्वारकाधीश किंवा जगत किंवा त्रिलोक सुंदर मंदिर असे म्हटलं जाते. द्वारकेच्या तटावरच हे मंदिर असून त्याची शैली चालुक्य काळातील आहे.

Krishna Janmashtami : गुरुवायूर (केरळ)

केरळमध्ये हे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर (Krishna Janmashtami) असून ते सन 1638 मध्ये बांधले होते. देवांचे गुरु बृहस्पती व वायूदेवांनी आराधिलेल्या चतुर्भुज श्रीकृष्णाचे हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. या मंदिराला अनेक भाविकांनी हत्ती अर्पण केलेले आहेत.

राधा मदनमोहन (वृंदावन)

श्रीकृष्णाची लीलाभूमी असलेल्या पवित्र वृंदावनात अनेक प्राचीन व प्रसिध्द श्रीकृष्णमंदिरे आहेत. त्यामध्येच श्री राधा मदनमोहन मंदिराचा समावेश होतो. 50 फूट उंचीच्या द्वादशादित्य टेकडीवर हे मंदिर आहे. हे वृंदावनातील पहिले मंदिर मानले जाते. तिथे राधा व तिची सखी ललिता यांच्यासह श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे.

Krishna Janmashtami : बांकेबिहारी (वृंदावन)

वृंदावनातील सर्वात प्रसिध्द मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. महान भक्त आणि संगीततज्ज्ञ स्वामी हरिदास यांच्या आराधनेचे फलित म्हणजे हे मंदिर होय. या मंदिराजवळील निधीवनही जगप्रसिध्द आहे.

राधारमण मंदिर (वृंदावन)

वृंदावनातील सर्वात प्रसिध्द सात मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. सन 1542 मध्ये हे मंदिर उभे राहिले. गोपाल भट्ट गोस्वामी यांच्या भक्तीने येथील आराध्य देव श्री राधारमण साकार झाले. वृंदावनातील अनेक मंदिरांमधील मूर्ती मुघल आक्रमणाच्या काळात राजस्थानमध्ये हलवण्यात आल्या होत्या व नंतर दुसरी मूर्ती बनवून मंदिरांमध्ये स्थापन केल्या गेल्या. मात्र या मंदिरातील शाळीग्राम शिळेतील चिमुकली व अत्यंत सुंदर अशी राधारमण मूर्ती मूळचीच आहे.

उडुपी श्रीकृष्ण मंदिर (कर्नाटक)

कर्नाटकात समुद्रकिनारी असलेल्या उडुपी येथे हे प्रसिध्द मंदिर आहे. मध्वाचार्यांना मिळालेल्या सुंदर श्रीकृष्ण मूर्तीचे इथे दर्शन होते. एका हातात रवी आणि दुसर्‍या हातात रवीचे दोर धरलेल्या बाळकृष्णाची मूर्ती या मंदिरात आहे. कनकदासांच्या भक्तीमुळे ही मूर्ती पाठीमागे वळली आणि भिंतीला भगदाड पडून तिने कनकदासांना दर्शन दिले. आजही याच खिडकीतून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले जाते.

श्रीनाथजी (राजस्थान)

राजस्थानच्या नाथद्वारामध्ये हे मंदिर आहे. गोवर्धन पर्वतावरील गोवर्धन धारण केलेल्या श्रीकृष्ण मूर्तीला ‘श्रीनाथजी’ असे म्हटले जाते. अशाच श्रीनाथजींचे हे मंदिर आहे. मुघल काळात ही मुर्ती गोवर्धनवरूनच आणली गेली होती. याठिकाणी होळी, दिवाळी व जन्माष्टमीला भाविकांची मोठी गर्दी असते.

Krishna Janmashtami : केशवदेव मंदिर (मथुरा)

मथुरेतील या मंदिराला श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर असेही म्हटले जाते. याच ठिकाणी द्वापारयुगाच्या काळात श्रीकृष्णांचे अवतरण झाले असे मानले जाते. तिथे केशवदेवांचे भव्य मंदिर असून मंदिरात राधाकृष्णाच्या भव्य मूर्ती आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी देश-विदेशातून असंख्य भाविक येत असतात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button