भाजपाच्या मुंबईतील यादीत 10% गुजराती,उत्तर भारतीय उमेदवार किती?;मराठी उमेदवार किती आणि कोण?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी होईल असा अंदाज बांधला जात आहे. मुंबईवर दोन गुजरात्यांचा डोळा असल्याचं विधान रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यामध्ये केलं.
खरं तर सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये स्थानिक मराठी विरुद्ध गुजराती किंवा उत्तर भारतीय असा सुप्त संघर्ष आरोप-प्रत्यारोपांमधून पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीचा मुद्दा मुंबईच्या निवडणुकीत प्रतिष्ठेचा बनवला आहे. युती करतानाही आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, असं ठाकरे बंधुंनी सांगितलं. मात्र भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीकडे पाहिल्यानंतर भाजपाने पाहिल्याच यादीतून ठाकरे मराठीचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. भाजपा मराठीविरोधी आहे असं चित्र उभं करण्याचा ठाकरे बंधूंच्या दाव्याला भाजपाने उमेदवार यादीमधून उत्तर दिलं आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत 67 उमेदवार असून त्यापैकी किती मराठी आहेत आणि किती गुजराती अथवा उत्तर भारतीय तसेच ते कुठून लढणार आहेत हे पाहूयात…
उत्तर भारतीय उमेदवार किती
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मनसेमुळे काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली. या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांचा मुद्दाही महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळेच भाजपा किती उत्तर भारतीय उमेदवारांना संधी देते हे महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या यादीतील 67 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत.
वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा (उत्तर भारतीय)
10 टक्के उमेदवार गुजराती
भारतीय जनता पार्टी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीमधील जवळपास 10 टक्के उमेदवार हे गुजराती आहेत. भाजपाने 67 पैकी 6 उमेदवार हे गुजराती दिले आहेत. गुजराती उमेदवारांमध्ये माजी आमदार किरीट सोमय्या यांच्या मुलासहीत अन्य पाच जणांचा समावेश आहे. हे गुजराती उमेदवार कोण आणि ते कुठून लढणार आहेत ते पाहूयात…
वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 174 – साक्षी कनोजिया (गुजराती)
मराठी उमेदवार किती आणि कोण?
भाजपाच्या पहिल्या यादीमधील 67 उमेदवारांपैकी तब्बल 48 उमेदवार हे मराठी आहेत. हे उमेदवार कोणते आणि ते कुठून लढणार आहेत? त्यांचा वॉर्ड क्रमांक कोणता आहे ते पाहूयात…
वॉर्ड क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी
वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम
वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर
वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत
वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती
वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग
वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार
वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव
वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत
वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते
वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर
वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे
वॉर्ड क्रमांक 172 – राजश्री शिरोडकर
वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर
वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर
वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर
वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ
वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे
वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील
वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित
वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
वॉर्ड क्रमांक 95 – हरि शास्त्री
इतर उमेदवार
वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना (पंजाबी)
वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी (सिंधी)










