डर्बन शहरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिराचे उद्घाटन…

चिन्मय मिशनचे दक्षिण आफ्रिकेतील आध्यात्मिक प्रमुख स्वामी अभेदानंद सरस्वती यांनी शहरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिराचे उद्घाटन केले. श्री अन्नपूर्णादेवीचे मंदिर हे भारतीय उपखंडाबाहेरील जगातील पहिले मंदिर आहे.
येथे पहा !
या मंदिराचे उद्घाटन १ डिसेंबरला म्हणजे मोक्षदा एकादशीच्या शुभदिनी ४ सहस्र भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. २१ नोव्हेंबर या दिवशी जोहान्सबर्ग येथे ‘जी-२०’ (कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझिल, रशिया, फ्रान्स, यूके, जर्मनी, इटली, तुर्कीये, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, भारत, चीन, दक्षिण कोरिया, जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तसेच युरोपियन युनियन या देशांच्या नेत्यांचे) नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी अभेदानंद यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी मंदिरासाठी पवित्र अष्टलक्ष्मी कलश भेट म्हणून दिला होता.
१. श्री अन्नपूर्णादेवीकडे असलेल्या पोषणशक्तीचे आवाहन करून दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक समुदायांमधून उपासमार दूर करणे आणि त्यांचे उत्थान करणे हा श्री अन्नपूर्णादेवीचे मंदिर उभारण्यामागील उद्देश आहे.
२. ‘चिन्मय मिशन’ने ऑक्टोबर २०२४ पासून दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘नरिश टू फ्लरिश’ (समृद्धीसाठी पोषण) हा प्रमुख सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे डर्बन शहरामधील आतापर्यंत २ लाख ५० सहस्र गरीब आणि शाळकरी मुले यांना विनामूल्य भोजन देण्यात आले आहे.
३.
३. या उपक्रमाद्वारे प्रतिदिन २ सहस्र गरजू लोकांना पौष्टिक आहार विनामूल्य देण्यात येत आहे. डर्बनमधील ‘चिन्मय अन्नपूर्णा आश्रमा’तील अत्याधुनिक भव्य औद्योगिक स्वयंपाकघरातून या भोजनाची व्यवस्था केली जाते.
४. या प्रकल्पाला श्री अन्नपूर्णादेवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी स्वामी अभेदानंद यांना या मंदिराची संकल्पना सुचली.
ऑगस्ट २०२३ मध्ये चिन्मय मिशन आश्रमातील आधुनिक स्वयंपाकघराचे भूमीपूजन करण्यात आले. त्या वेळी स्वामी अभेदानंद यांनी, ‘श्री अन्नपूर्णादेवी येथे हातात पळी घेऊन बसेल आणि लाखो लोकांना भोजन देईल. तुम्ही केवळ २-३ वर्षांत तिची किमया पाहा !’, असे विधान केले होते. २ वर्षांपेक्षा अल्प कालावधीत या आधुनिक स्वयंपाकघराद्वारे सहस्रोंना भोजन पुरवले जात आहे. ‘स्वामीजींची पवित्र भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठीच जणू श्री अन्नपूर्णादेवी काशीतील गंगा नदीच्या काठावरून दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या किनार्यावर अवतरली’, असे चिन्मय मिशनच्या भक्तांना वाटत आहे.











