विकृतीचा कळस! अनैतिक संबंधातून बलात्कार; वेदनेने तडफडून महिलेने…

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहीत महिलेच्या बॉयफ्रेंडने विकृतीची परिसीमा ओलांडत महिलेला त्रास दिला आहे. महिलेने वेदनांना आकांतून आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे.
या घटनेचा पोलीस खोलवर जाऊन तपास करत आहे. Kanpur Rape Case
नेमकं काय घडलं?
कानपूरच्या बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशपूर गावात ही घटना घडली आहे. मानसी असं मृत महिलेचे नाव असून तीचे लग्न ३ वर्षांपूर्वी झाले होते. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसीचं मागील ९ महिन्यापासून एका तरुणाच्या संपर्कात होती. मनीष यादव असं त्याचे नाव होते. सोशल मीडियावर दोघांची ओळख झाल्यापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. मनीषने जवळी साधून मानसीसोबत प्रेमसंबंध जुळवले. मानसीच्या वडिलांनी सांगितले की, ६ महिन्यांपूर्वी मानसी माहेरी आली होती. ती एका कार्यक्रमासाठी आली होती.
त्यावेळी कार्यक्रम संपताच मनीष सोबत निघून गेली. बराच वेळ न आल्याने तीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. १० दिवसांनंतर मानसी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आपण मर्जीने मनीषसोबत गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाला याची माहिती दिली. यानंतर ती मनीषसोबत त्याच्या घरी राहत असल्याचे सांगितले जाते.
घटनेच्या दिवशी मानसीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ तिच्या कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मानसीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मनीष यादवविरोधात तक्रार दाखल केली.
मानसीच्या आईने आरोप केला की, मनीषने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर कापडाचे तुकडे तिच्या प्राईव्हेट पार्टमध्ये भरले. या सर्व अमानुष छळाला तीला सामोरे जावे लागले, त्यामुळेच तिने टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.











