जनरल नॉलेजताज्या बातम्यामहत्वाचेलोकशाही विश्लेषण

दारु पिताना काय खावं? Whisky सोबत सर्वात चांगला चकणा कोणता? फक्त 1 टक्के लोकांनाच माहितीय…


मद्यपान करणाऱ्या लोकांना दारूचं व्यसन हे एखाद्या औषधाप्रमाणे वाटतं. पण आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टर दारूचे सेवन करण्यास मनाई करतात. अनेकदा दारू पिणारे लोक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये व्हिस्की किंवा रम घेण्याचा सल्ला देतात.

अनेकांचा असं वाटतं की, हिवाळ्यात रम पिणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात दारू प्यायल्याने शरीराला उब मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

पण तुम्हाला माहिती आहे का, दारूसोबत काय खावे? अनेकजण दारूसोबत चकण्यामध्ये नमकीन, चिप्स किंवा चिकन वगैरे खातात. दारूसोबत हे सर्व पदार्थ खाणे योग्य आहे का? इन्स्टाग्राम पेज ‘गोयल साहब के नुस्खे’वर डॉ. सुभाष गोयल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की दारूचे सेवन करणे हानिकारकच असते. पण जर तुम्ही दारू पित असाल, तर तिच्यासोबत काय चकणा खावं? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दारूसोबत काय खावे?

डॉ. सुभाष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्याने लिव्हरवर परिणाम होतोच, पण दारूसोबत आपण कोणत्या पदार्थांचं सेवन करतो, हेही महत्त्वाचे आहे. अनेकजण नॉनव्हेज खातात, काहीजण काही खातच नाहीत किंवा नमकीन-पकौडे वगैरे खातात. सुभाष गोयल यांनी सांगितले की दारूसोबत नेहमी हेल्दी फूड घ्यावे. दारूसोबत पनीर खा, सलाड खा. याशिवाय सलाडमध्ये भाजलेले चणे किंवा उकडलेले चणे खावेत. दारूसोबत हेल्दी फूड खाल्ल्याने थोडे कमी नुकसान होते. मात्र, डॉ. सुभाष गोयल यांनी सांगितले की दारूचे सेवन टाळावे, कारण त्याचा फायदा नाही, फक्त नुकसानच होते.

व्हिस्कीसोबत सर्वोत्तम चखणे कोणते?

दारूसोबत तुम्ही शेंगदाणे किंवा काहीतरी चटपटीत खाण्याऐवजी ग्रीन सलाड घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही आणि नशा काही प्रमाणात कमी होईल. तुम्ही प्रयत्न करा की चखण्यात जास्तीत जास्त अशा गोष्टी असाव्यात ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. अंकुरित धान्यालाही तुम्ही हेल्दी चकण्याच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button