राज्यातील नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असतानाच काँग्रेसला कल्याणमध्ये मोठा झटका बसला आहे. कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह अनेक ब्लॉक अध्यक्षांनी एकत्रितपणे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे
या राजीनाम्यामुळे काँग्रेसचा पक्ष ऐन निवडणुकीच्या काळात कमकुवत झाला आहे.
सचिन पोटे हे Sachin Pote गेल्या ११ वर्षांपासून कल्याण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अचानक पक्षाकडून राजीनामा देण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्षाबरोबर इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि ब्लॉक अध्यक्षांनीही आपले राजीनामे पाठवले आहेत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर सपकाळ या राजीनाम्यांना मान्यता देतील की नाही.सचिन पोटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा रंगली आहे. ते पक्ष सोडतील की पक्षात राहून पुढे काम करेल, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. पूर्वी अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजप किंवा इतर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे सचिन पोटे कोणत्या निर्णयावर येतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या काही दिवसांत राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा समावेश आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला प्रचारात मोठा धक्का बसला आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना पक्षातील सत्ताबळावर आणि मतदारांवर किती परिणाम करेल, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. कल्याणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही या राजीनाम्यानंतर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Back to top button