बीड,120 बोगस मास्तरांना केल जाणार कार्यमुक्त.!
बीड : राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या टीईटी (TET) घोटाळ्यात, बीड (Beed) जिल्ह्यातील 120 शिक्षकांचा समावेश आहे या 120 शिक्षकांनी बोगस टीईटी प्रमाणपत्र हस्तगत करून विविध अनुदानित खासगी संस्थेत नोकरी मिळवली आहे. या बाबत बीड जिल्हा परिषदेने, 120 बोगस टीईटी प्रमाणपत्रे हस्तगत केले आहेत शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळालीय.
शिक्षण विभागाला याबाबत अधिकृत आदेश आल्यानंतर, या शिक्षकांची संस्थेतली सेवा कार्यमुक्त केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बोगस बहाद्दर शिक्षकांकडून, उचलण्यात आलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती सामन्युज कडून देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाला याबाबत अधिकृत आदेश आल्यानंतर, या शिक्षकांची संस्थेतली सेवा कार्यमुक्त केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बोगस बहाद्दर शिक्षकांकडून, उचलण्यात आलेला पगार वसूल करण्यात येणार आहे
विशेष म्हणजे या 120 पैकी जिल्हा परिषदेचा एकही शिक्षक नाही. मात्र आंतर जिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेला एखादा बोगस टीईटी प्रमाणपत्र धारण केलेला शिक्षक आहे का ? हेही तपासण्यात येत आहे. या बोगस शिक्षकांची किती वर्षे सेवा झालेली आहे, त्यांनी किती पगार उचललेला आहे, याबाबत तपासणी करणे चालू आहे.
शासनाचे आदेश यांच्या बाबतीत अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. मात्र येत्या एक-दोन दिवसात हे आदेश प्राप्त होतील. त्यानंतर ज्या संस्थेत हे शिक्षक आहेत, त्या संस्था चालकाला पत्र देऊन, या शिक्षकांची सेवा कार्यमुक्त करण्यात येणार आहे. सोबतच सेवा कालावधीमध्ये यांनी उचललेला पगार वसुलही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.