बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात पहिली रेल्वे धावली ….

बीड : मराठवाड्यातील बीडमध्ये रेल्वेच नाही तर विकास वाहिनीही पोहोचली आहे, ज्याद्वारे विकासाची अपेक्षित गती साध्य होईल. बीडमध्ये सुरू झालेल्या रेल्वेचे लोकार्पण गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू झाली असून त्या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आजता दिवस श्रेयवादाचा आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. हा जगन्नाथाचा रथ आहे, अनेकांचा हात या कामासाठी लागला.
बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला दिशा दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना मी वंदन करतो. आज आपल्या जनतेचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न बघितलं. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, आम्ही गोपीनाथराव मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. रेल्वे संघर्ष समितीचेदेखील मी अभिनंदन करतो. या रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन करणे हे एक कठीण काम होते. आम्ही केंद्र सरकारला पत्र दिले होते की राज्य सर्व प्रकल्पांमध्ये ५० टक्के सहभाद राज्य घेईल अस पत्रं आम्ही केंद्र सरकारला दिले. मराठवाड्याच्या रेल्वेसाठी फक्त ४०० कोटी रुपये दिले होते. पण गेल्या १० वर्षांत मराठवाड्याला २१ हजार कोटी रुपये देण्यात आले.”
पुढील पिढी दुष्काळ पडू देणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ आणखी बिकट होऊ देणार नाही. कोल्हापूर-सांगलीमध्ये येणारे पाणी उजनीला आणले जाईल आणि तिथूनचे पाणी मराठवाड्यात येईल. वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार. त्यासंबंधी हे सरकार काम करत आहे.”
बीडमध्ये पहिली रेल्वे सुरू झाली
आज बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात पहिली रेल्वे धावत आहे. त्यामुळे केवळ बिडकरांमध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार आहे. रेल्वे मार्गामुळे भारताचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नवीन उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
अशी असेल बीडची रेल्वे
बीड ते अहिल्यानगर हे अंतर १६७ किमी आहे. त्यामध्ये बीडसह एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे.
बीड
रायमोह
रायमोहा
विघनवाडी
जाटनांदूर
अळमनेर
हातोला
वेताळवाडी
न्यू आष्टी
कडा
न्यू धानोरा
सोलापूरवाडी
न्यू लोणी
नारायणडोहो











