क्राईम

अंघोळ करताना WhatsApp Video Call आला, समोर नग्नावस्थेतील तरुणी अन् 14 लाखांचा गंडा..


छत्रपती संभाजी नगरमधीलमधील संदेश नगर येथे सायबर गुन्हेगारीची अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 23 मार्च रोजी येथील एका व्यक्तीला व्हॉट्सअप कॉल आला.

या कॉलवरील महिलेने सदर व्यक्तीचे अर्थनग्नावस्थेतील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर हे व्हिडीओ दाखवून या व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्यात आली. महिन्याभराच्या कालावधीमध्ये या व्यक्तीकडून फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी 14 लाख 66 हजार 773 रुपयेंची खंडणी घेतली. अखेर या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

 

अंघोळ करत असताना आला व्हिडीओ कॉल

झालं असं की, 23 मार्च रोजी वयस्कर पीडित व्यक्ती अंघोळ करत असताना तिला एक व्हिडीओ कॉल आला. अनोळखी क्रमांकावरुन आलेला का हॉल व्यक्तीने आहे त्या अवस्थेत रिसिव्ह केला. तर कॉलवर समोरच्या बाजूला एक तरुणी नग्नावस्थेत होती. ही पीडित व्यक्ती अर्धनग्नावस्थेत असतानाच समोरच्या तरुणीने हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. नंतर अचानक हा कॉल बंद झाला.

 

फोन येऊ लागले अन् खंडणी वसुलीला सुरुवात

मात्र काही वेळाने या पीडित व्यक्तीला हेमंत मल्होत्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने पाडित व्यक्तीला तुमचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रमोद राठोड नावाच्या एका व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीसोबत फोनवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्याने पीडित व्यक्तीला सदर प्रकरणामधून बाहेर पडायचं असेल तर सांगतो तेवढे पैसे दे अथवा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा, अशा शब्दांमध्ये धमकावलं. त्यानंतर 23 मार्च ते 28 एप्रिल या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आरोपींनी या पीडित व्यक्तीकडून 14 लाख 66 हजार 773 रुपयांची खंडणी घेतली.

 

इतरांनाही असा लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शंका

एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम दिल्यानंतरही या व्यक्तीला केलं जाणारं ब्लॅकमेलिंग थांबलं नाही. अखेर या व्यक्तीने मनातली बदनामीची भीती बाजूला सारत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये पोलिसांना सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अऱविंद सिंग आणि अन्य दोघांचा समावेश आहे. अशाप्रकारे या टोळीने इतरांनाही मोठे आर्थिक गंडा घतला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या टोळीचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button