वर्षानुवर्षे पोटात साचलेली घाण लगेच शरीराबाहेर पडेल; बाबा रामदेव यांनी सांगितल्या जादुई ट्रिक्स ..

आ जकालचे धावपळीचे जीवन, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अनियमित झोप आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि यातीलच एक समस्या म्हणजे पोट साफ न होणे… अनेकजण या समस्येने ग्रासलेले असून हे एक बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे.
ही समस्या सामान्य वाटत असली तरी याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. यामुळे आपला रोजचा दिनक्रम देखील बिघडतो. यावर उपाय म्हणून बाजारात अनेक औषध उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही घरीच या समस्येपासून सुटका मिळवू शकता. योगगुरू बाबा रामदेव यांनी नैसर्गिकरीत्या पोट साफ करण्यासाठीच्या काही प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही या रोजच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
डिटॉक्स ड्रिंकचा आधार घ्या
पचन सुधारण्यासाठी शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याबरोबरच तुम्ही नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्ससुद्धा घेऊ शकता. उदा. अननस डिटॉक्स वॉटर, सफरचंद सायडर व्हिनेगर वॉटर, काकडीचा रस किंवा फळांचे अर्कयुक्त पाणी. हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात उपयुक्त ठरतात.
आहारात बद्दल बद्दल करा
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी हलकं, कमी तेलकट अन्न खाणं महत्त्वाचं आहे. हिरव्या भाज्या, विशेषतः पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर खा. पेरू आणि सफरचंदसारखी फळं पचनास मदत करतात. जंक फूडपासून शक्य तितकं दूर राहा आणि भरपूर पाणी प्या.
सकाळचं रुटीन सुधारवा
बाबा रामदेव सांगतात की, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं आणि त्यानंतर थोडा वेळ चालणं हे पोट स्वच्छ होण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करा, यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. एकाचवेळी मोठं जेवण घेण्याऐवजी दिवसभर थोडं-थोडं खाणं उत्तम ठरेल.
अन्न नीट चावून खा
बाबा रामदेव यांच्यानुसार, अनेक लोक अन्न चावत न देता पटकन गिळतात, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. हेच बद्धकोष्ठतेचं मुख्य कारण आहे. म्हणून प्रत्येक घास नीट चावून आणि शांतपणे खाणे महत्त्वाचे आहे.
हिरव्या भाज्यांचा समावेश करा
हिरव्या भाज्यांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक भरपूर असतात, जे बद्धकोष्ठतेपासून संरक्षण देतात. पालक, पालेभाज्या, भोपळा, गाजर, सलगम, टोमॅटो आणि केळी यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा.