भाच्यासोबत बेडरूममध्ये रोमान्स, तेवढ्यात पती आला अन्…
नात्यातील कुठल्याही वयाच्या पुरूष किंवा स्रीशी शरीरसंबंध ठेवण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि त्या उघड झाल्यावर होणाऱ्या खुनांचंही प्रमाण वाढलं आहे. असाच गुन्हा उत्तर प्रदेशात घडला आहे ज्यात एका विवाहितेने आपल्या भाच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नवऱ्याने रंगेहाथ पकडल्यावर नाचक्की होण्याच्या भितीने दोघांनी विवाहितेच्या पतीला संपवलं.
नात्याला काळिमा फासणारी घटना
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये नात्यांना काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथे एक मामी भाच्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांना सेक्स करताना महिलेच्या पतीने रंगेहाथ पकडलं. त्यानंतर तिघांमध्ये प्रचंड वादावादी झाली. भाच्याशी अनैतिक संबंध असल्याची बाब बाहेर कळाली तर आपली नाचक्की होईल असं महिलेला वाटल्याने तिने प्रियकर भाच्याच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी महिला आणि तिचा भाचा यांना अटक केली आहे, अशी माहिती खैरगड विभाग पोलिसांनी दिली आहे.
खैरगड विभागातील सिरमई गावात राहणाऱ्या सत्येंद्र सिंह (40) याचा अचानक मृत्यू झाल्याचं कळाल्यावर परिसरात खळबळ माजली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. सत्येंद्र यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना तपासात लक्षात आलं. मृताची पत्नी रोशनी हिची चौकशी करताना ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्याने पोलिसांना संशय आला. रोशनीला पोलिसी इंगा दाखवल्यानंतर तिने भाच्याच्या मदतीने आपणच नवऱ्याचा खून केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रोशनीनी पोलिसांना सांगितलं की तिचा भाचा गोविंदशी तिचे अनैतिक संबंध होते. मंगळवारी रात्री पती सत्येंद्र यांनी त्या दोघांना शारीरिक संबंधांवेळी रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर लोकलज्जेच्या कारणास्तव आम्ही पती सत्येंद्र यांचा खून करण्याचं ठरवलं आणि दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळून खून केला. रोशनीच्या कबुली जबाबानंतर भाचा गोविंद सिंहलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, असं खैरगडमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.