पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्रालाच संपवलं,दारु पाजली-हातोड्यानं घाव घातले अन…

समाजव्यवस्थेचा घटक असलेली लग्न ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या नातेसंबंधांमध्ये बराच तणाव असतो. अनेक कारणांमुळे स्री-पुरूष दोघांचेही विवाहबाह्य संबंध वाढल्याच्याही बातम्या येतात.
मग संशयामुळे काही अप्रिय घटनाही घडतात. काही कारणांमुळे आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्याचा खून करून किंवा त्याचा छळ करून आपणच त्याला शिक्षा द्यावी, अशी वृत्ती वाढल्याचं दिसतं. असाच प्रकार मुंबईजवळ बदलापुरात घडला आहे. आपल्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आपल्या मित्राला एकाने जीवे मारलं आहे.
कुठे घडली घटना?
बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या रवी (30) (नाव बदललेलं) याने राजेश (29) याला दारू पाजून त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून खून केला आहे. राजेश याने आपल्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याने केला असून, त्याचा बदला घेण्यासाठी आपण राजेशचा खून केल्याची कबुली रवीने दिल्याची माहिती बलापूर पूर्व पोलिसांनी दिली.
मित्राच्या कृत्याचा नवऱ्यानं घेतला बदला
रवी हा मूळचा शिरगावचा राहणारा असून बदलापुरात एका खासगी कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. तो बदलापूर पूर्व भागात आपल्या पत्नीबरोबर राहतो. रवीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हा रवीचा जवळचा मित्र होता. तो नेहमी त्यांच्या घरी यायचा त्यामुळे त्याच्या पत्नीशी त्याची चांगली ओळख होती. पत्नी घरी एकटी असताना राजेश रवीच्या घरी आला आणि त्याने रवीच्या पत्नीवर बलात्कार केला. राजेशने तिला नवऱ्याला याबाबत सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
नवऱ्याला कळताच घडलं भयंकर
रवीच्या पत्नीने मोठ्या धैर्याने घडलेला सगळा प्रकार रवीला सांगितला. त्यानंतर दोघांनी राजेशला घरी बोलवून त्याचा खून करण्याचा प्लॅन केला, असंही रवीने कबुली जबाबात सांगितलं. त्या दोघांनी प्लॅननुसार 10 जानेवारीला राजेशला घरी पार्टीला बोलवलं. त्याला भरपूर दारू पाजली. तो रात्री झोपल्यावर रवीने त्याच्या डोक्यावर हातोड्याने घाव घातले. त्यात राजेशचा मृत्यू झाला.
असा झाला हत्येचा उलगडा
रवीने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना फोन करून माहिती दिली की राजेश त्यांच्याकडे आला होता. बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टेमला पाठवल्यावर त्या रिपोर्टमध्ये राजेशचा मृत्यू डोक्यावर जड वस्तूने आघात केल्यामुळे झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांनी रवीची कसून चौकशी केली.
रवी सुरुवातील गुन्हा मान्य करत नव्हता. उडवाउडवीची उत्तरं देत होता; पण त्याला पोलिशी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सगळी घटना व प्लॅन सांगितला .