व्हिडिओ न्युजशेत-शिवार

VIDEO पाहून तर झोप उडेल, शिमला मिरची कापताच बाहेर हे काय आलं? बाजारातून भाजी विकत घेताना …


सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे.

 

कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते खराब भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शिमला मिर्चीमध्ये काय आढळलं ते एका व्हिडीओमधीन समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही शिमला मिर्ची घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये एक महिला शिमला मिरची नेहमीप्रमाणे कापत आहे. भाजी अगदी मधोमध कापल्यावर या महिलेला यामध्ये एक धागा दिसतो. तो धागा ती बाहेर काढते तेव्हा तो स्वत:च हालू लागतो. महिला धागा निट पाहते तेव्हा लक्षात येतं की हा धागा नाही तर एक वेगळ्या प्रकारचा किडा आहे. हा एक थ्रेड किडा आहे. जो पोटात गेल्यानंतर तुमच्या मासपेशी खाण्यास सुरुवात करतो. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

बाजारातून भाजी विकत घेताना १०० वेळा विचार कराल

हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तुमच्यासोबतही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे कोणतीही भाजी करताना आधी स्वच्छ करुन घ्या. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. उद्या आपल्यासोबतही हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर @Krishnavallabhi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

 

Live लोकसभा निवडणूक निकाल 2024,भारतात पुन्हा कमळ फुलणार

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button